●पोलीस मुख्यालयात कोरोनाचा मुक्काम
●टेम्परेचर गनने तपासणी करून प्रत्येकाला प्रवेश देण्याची पोलीस कर्मचाऱ्यांनी केली मागणी
●काही बाधित पोलीस घरीच उपचार घेत आहेत
सातारा / प्रतिनिधी
पोलीस कर्मचारी हे कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यातुन त्यांना कोरोनाची लागण होतेय. वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांच्यासह मुख्यालयातले तेरा कर्मचारी कोरोना बाधित आहेत.तर वाहतूक शाखेचे एक अधिकारी व एक कर्मचारी बाधित आहे.मोटार वाहन विभागातील पीसीआरमधील एक आणि मुख्यालयातले एक कर्मचारी बाधित झाले आहेत.
शहरात व जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी सातारा पोलीस प्रचंड मेहनत घेत आहे.पोलिसांना कुठे कोण कसा भेटेल हे सांगता येत नाही.पोलीस बाधित होण्यामागे त्यांच्या जास्त तपासण्या होत आहेत.गेल्या दोन दिवसांपूर्वी सातारा पोलीस मुख्यालय आणि शहर वाहतूक शाखा, मोटार वाहन विभागात कोरोना बाधित आढळून आलेत. वाहतूक शाखेचे अधिकारी हे स्वतः काळजी घेत होते.तरीही त्यांना टायफॉईडची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी उपचारा दरम्यान स्वॅब तपासणी केली तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.आता ते उपचार घेत असून वाहतूक शाखेत आणखी एक जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. ते कोणाच्याही बाधितांच्या संपर्कात नव्हते. त्यांनी दि.14रोजी तपासणी केली तेव्हा ते निगेटिव्ह आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते ही उपचार घेत आहेत. पोलीस मुख्यालयातले वाचक शाखेतले कोणाच्या ही संपर्कात नसणारे एक अधिकारी पॉझिटिव्ह आले.त्यांच्यासोबत पाच महिला आठ, आठ पुरुष कर्मचारी ही बाधित आले आहेत. त्यामुळे पोलीस मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची टेम्परेचर टेस्ट करण्यात यावी अशी पोलीस कर्मचारी मागणी करत आहेत.