साताऱ्यात सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोंदणी सुरु, स्फुतनिक व्हीची लस कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मिळणार
प्रतिनिधी / सातारा
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचे महत्व प्रत्येकाला पटू लागले आहे. त्यातच पाण्यासाठी ग्रामीण भागात जशा रात्रभर रांगा लावल्या जायच्या तशाच आता लसीसाठी लसीकरण पेंद्राबाहेर रांगा लावल्या जात आहेत. खाजगी रुग्णालयात लस देणे बंद केले होते. आता पुन्हा खाजगी रुग्णालयांनी लस विकत घेतली असून शुक्रवारपासून जिह्यात दोन रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होणार प्रथमच सातारा जिह्यात नामांकित अशा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्फुतनिक व्ही ही लस मिळणार आहे. त्यामुळे गुरुवारीही अनेकांनी ही लस घेण्यासाठी बुकींग केली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिह्यातील लसीकरण केंद्रावर एकही लस शिल्लक नाही.
लस घेण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे. सातारा जिह्यातील अनेक गावे अशी आहेत की तेथे लसीचा पत्ताच नाही. सरकारची लस कधी मिळेल हे सांगता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ 100 लसी येतात. तेथेही पुढाऱयांच्या बगलबच्च्यांना लस द्यावी लागते. सर्वसामान्यांना मात्र लस घेण्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱया डोससाठी रिमांईडचे मेसेज येवूनही डोस कुठे मिळतील यासाठी वणवण भटकावे लागते आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी साताऱयातील काही खाजगी हॉस्पिटलमध्ये लस मिळत होती.
गर्दीत उभे राहण्यापेक्षा अडीचशे रुपये देवून ती लस घेवून नागरिक मोकळे होत होते. गर्दीत कोरोना वाढतो ही मनामध्ये भिती होती. पुन्हा सरकारचे नियम बदलले आणि खाजगी रुग्णालयातील लस देणे बंद झाले. त्यानंतर उद्या शुक्रवारपासून सातारा जिह्यात दोन खाजगी हॉस्पिलटमध्ये लस उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये सातारा शहरातील सातारा डायग्नोस्टीक सेंटरमध्ये कोव्हीशिल्ड ही लस 780 रुपये तर कोव्हॅक्सिन ही लस 1410 रुपयांना देण्यात येणार आहे.
तर सर्वात प्रथमच सातारा जिह्यात कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्फुतनिक व्ही ही लस शुक्रवारी देण्यात येणार आहे. ही लस 1145 रुपयांना देण्यात येणार आहे. सकाळी 9 नंतर लस देण्यात येणार आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे सातारा जिह्यात पहिला स्फुतनिकचा टुचूक कोण ठरणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागून राहिले आहे.