प्रतिनिधी / म्हसवड :
येथील प्रिन्स एन्वायरमेन्ट सोल्यूशन प्रा. लिमिटेड या संस्थेचे वैभव सरतापे हे शौचालयाच्या टाक्या मशिनरीद्वारे स्वच्छ करण्याचा व्यवसाय करत असताना सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे या गावातील शंकर माने यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मनीमंगळसूत्र शौचालयाची टाकी स्वच्छ करताना सापडले होते ते म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे यांच्या हस्ते शंकर माने यांना परत करुन वैभव सरतापे यांनी प्रामाणिकपणे परत करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असल्याचे सपोनि वाघमोडे यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ात ते कामानिमित्त सांगोला तालुक्यातील कोळे येथील शंकर माने यांच्या घरातील शौचालयाची टाकी मशिनच्या सहाय्याने साफ केली व सरतापे आपली शौचालयाची गाडी घेऊन म्हसवडला आले व ते गाड़ी खाली करण्यासाठी डंपिंग ग्राउंडवर टाकी खाली केली व ती टाकी पाण्याने स्वच्छ करत असताना दोन तोळे वजनाचे मनीमंगळसूत्र असल्याचे ड्रायव्हर राजू खरात व प्रमोद सरतापे यांनी वैभव सरतापे यांना सांगितले. सरतापे यांनी शंकर माने यांच्याकडे चौकशी केली असता माने म्हणाले, तो दागीना एक महिण्यापूर्वी पडला होता. तो माझ्या पत्नीचा आह.s खात्रीसाठी खरेदीची पावती माझ्याकडे आहे असे म्हटल्यावर खात्री पटली व घेऊन जाण्यास सांगितले.