वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी यष्टीरक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य साबा करीमची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या टॅलेंज सर्च प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत साबा करीम बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे सरव्यवस्थापक होते. 53 वर्षीय साबा करीमने 1990 च्या उत्तरार्धात ते 2000 या कालावधीत 34 वनडे आणि एकमेव कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. दुखापतीमुळे साबा करीमला क्रिकेटमधून लवकर निवृत्त व्हावे लागले होते. साबा करीम आता दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक वर्गामध्ये दाखल होणार आहे.