नागा चैतन्यपासून घेतला घटस्फोट
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू मनशांतीच्या शोधात ऋषिकेश येथे पोहोचली आहे. अलिकडेच तिने नागा चैतन्यकडून घटस्फोट घेतला आहे. सामंथाने स्वतःच्या या ट्रिपची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. ती ऋषिकेशमधील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. तिच्या छायाचित्रांमध्ये वशिष्ठ गुहा आश्रमही दिसून येते.
तिच्या छायाचित्रांमध्ये निसर्गाचे मनाला सुखावणारे सौंदर्य दिसून येते. एका छायाचित्रात स्वामी पुरोषोत्म नंद महाराज वशिष्ट आश्रमाचे प्रवेशद्वार दिसून येत आहे. ‘आम्ही काय शोधत आहोत? आनंद? आम्ही जो आनंद शोधत आहोत तो आमच्यातच आहे’’ असे एका बोर्डवर लिहिल्याचे तिने छायाचित्रांद्वारे दाखवून दिले आहे.
घटस्फोट ही एक वेदनादायी प्रक्रिया आहे. मला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ द्या असे सामंथाने म्हटले होते. याचदरम्यान सामंथाने शाहरुख खानसोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘लायन’ चित्रपटासाठी सामंथाला विचारणा करण्यात आली होती. पण तिने याकरता नकार दिला आहे.