बारा नव्याकोऱया सायकली जप्त : कुडाळ पोलिसांची कारवाई : 23 जणांवर गुन्हा
डंपर चालक-मालकांसह दोन सायकल विक्रेत्यांचा समावेश
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ परिसरातील डंपरवर चालक म्हणून कार्यरत असलेल्या झारखंडमधील डंपर चालकांनी सायकलने कुडाळ ते झारखंड अस प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रवासही सुरू केला. मात्र, कुडाळ पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी बारा नव्याकोऱया सायकली जप्त केल्या. तसेच बारा चालकांसह नऊ डंपर मालक व दोन सायकल विक्रेत्यांसह 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी एकाने वॅगनार कार तेथेच सोडून पलायन केले. ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कुडाळ परिसरात डंपरवर मोठय़ा प्रमाणात झारखंडमधील तरुण चालक म्हणून काम करतात. लॉकडाऊनमुळे हे सगळे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांनी सायकलने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यर्थ ठरला. झाराप येथे कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे, उपनिरीक्षक राजेंद्र हुलावळे व सहकाऱयांनी ही कारवाई केली. या घटनेची माहिती मिळताच कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. 4500 ते 6800 रु. पर्यंत एका सायकलची किंमत आहे.
पोलीस हवालदार प्रकाश मोरे यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी डंपर चालक सजितकुमार सिंग, अजयकुमार सिंग, सुजितकुमार सिंग, प्रमोदकुमार सिंग, पवनकुमार सिंह, रामस्वरुप सिंह, आशिषकुमार सिंह, कैलाशकुमार सिंग, अजितकुमार सिंह, राकेशकुमार सिंह, संजीवकुमार सिंह, बच्चूकुमार सिंह (रा. झाराप), तर डंपर मालक उमेश दळवी, अमित नार्वेकर, अंकित नाईक, अक्षय वालावलकर, अमित वाळके, साईनाथ म्हाडदळकर (सर्व रा. कुडाळ), महेश नाईक (सरंबळ), एमएच – 06 – ए झेड – 6044 क्रमांकाच्या वॅगनार कारमधील चालक (रा. झाराप), तर कुडाळ येथील सायकल विक्रेते शिवाजी शारबिद्रे व सुनील पडते यांच्यावर भादंवि कलम 188, 269, 34, आपत्ती व्यवस्थापन कायदा 34, 51 (ब), कोविड – 19 उपाययोजना अधिनियम 2020 नियम – 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक कोरे यांनी सायकलने जाणाऱया चालकाकडे चौकशी केली असता, डंपर मालकांनी सायकल घेण्यास पैशांची मदत केल्याचे सांगून डंपर मालकांची नावे तसेच सायकली खरेदी केलेल्या दुकानांची नावे सांगितली.