इस्लामाबाद / वृत्तसंस्था
सार्क परिषदेसाठी पाकिस्तानने भारताला निमंत्रण दिले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताला निमंत्रित केल्याची माहिती सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, भारताला अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. यावषी सार्क परिषद पाकिस्तानात होईल, अशी अपेक्षा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. ‘सार्क’ हा अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा प्रादेशिक गट आहे.