ऑनलाईन टीम / गोवा
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर प्रभु पुष्कर अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून ते त्यांनी आपल्या ट्विटरवरुन याबाबत स्पष्ट केले आहे. यापुर्वी ते भाजपमधुन निवडणूक लढवणार असणार होते. मात्र ऐनवेळी भाजपने त्यांना उमेदवारी देण्याचे नाकारल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर झाले होेते भ्रष्टाचाराचे आरोप
पणजीमधील भाजप आमदाराने आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर गोव्यातील राजकारणात तापलं होते . पणजीचे आमदार बाबुश मोन्सरात यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी अभियंत्यांच्या नोकरीसाठी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता . या आरोपानंतर स्थानिक पक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडत. हे सरकार मेन्यू कार्ड सरकार आहे. आम्ही जे आरोप करत होतो, त्याला सत्ताधारी पक्षातील आमदारानेच दुजोरा दिलाय, असे ही सरदेसाई म्हणाले होते.
दीपक पाऊसकर यांची ओळख
दीपक चंद्रकांत प्रभू पौसकर हे 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून सनवॉर्डेम येथून गोवा विधानसभेवर निवडून आले. डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांची सार्वजनिक बांधकाम आणि वस्तुसंग्रहालय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.