प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक वाचनालयातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती वाचनालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी वाचनालयाचे कार्यकारी सदस्य प्रा. विनोद गायकवाड यांनी म. गांधी व लालबहादूर शास्त्राr यांचे ‘जीवन व कार्य’ याविषयावर संक्षिप्त भाषण केले. यावेळी उपाध्यक्ष नेताजी जाधव, सदस्य अभय याळगी, लता पाटील, संतोष नलवडे, प्रताप पाटील, प्रसन्न हेरेकर तसेच सभासद व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.