प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलांना न्यूमोकोकल आजारापासून सुरक्षित ठेवण्यात करिता सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्यूमोकोकल कॉज्युगेट वॅक्सिंग (पीसीव्ही) समावेश करण्यात आला आहे.
स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरिया पाच वर्षाच्या आतील मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. पाच वर्षाखालील मुलांमध्ये होणाया न्यूमोनियामध्ये 84ज्ञ् निमोनिया चे कारण हे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा जिवाणू आहे. तसेच या निमोनिया मुळे होणाया मृत्यू मध्ये 30 टक्के मृत्यू हे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जिवाणूंमुळे होतात. तसेच न्यून्यूमोकोकस बॅक्टेरिया चा संसर्ग झाल्याने पाच वर्षाच्या आतील मुलांना मेंदुज्वर सेप्टीसेमिया आणि निमोनिया सारखे गंभीर आजार होऊ शकतात मो कोकिल आजार हा संसर्गजन्य आजार असून तो एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला खोकला किंवा शिकतांना संपर्कात आल्यामुळे पसरतो. न्यूमोकोकल आजार ही एक मोठी सामाजिक आरोग्य समस्या आहे पाच वर्षाच्या आतील मुले आणि विशेष करून दोन वर्षाच्या आतील मुलांना हा आजार होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे लसीकरण वेळेत वेळापत्रकानुसार अन्या लस्सी सोबत जन्माच्या सहा ते चौदा आठवडय़ातील आणि नऊ महिन्यांत बूस्टर डोस दिला जातो.
सध्या न्यूमोकोकल कॉज्युगेट वॅक्सिंग (पीसीव्ही) वयोगटानुसार लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सातारा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर प्रमोद शेळके यांनी दिले आहे. सातारा जिह्यामध्ये दरमहा 1846 नियमित लसीकरण सत्रे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व बाह्य लसीकरण सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. तरी दिनांक 13 जुलैपासून(पीसीव्ही) लसीचा समावेश निमित्त लसीकरणा मध्ये करण्यात आले आला असल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
तसेच ज्या बालकांचे जन्मानंतर सहा आठवडय़ाचे देय लसीचे लसीकरण आहे अशा लाभार्थीचे सदर लसी बरोबर (पीसीव्ही)लसीचा पहिला डोस घ्यावा त्याकरिता आपल्या नजीकच्या आरोग्य सेविका किंवा आशा यांच्याबरोबर संपर्क साधून सदर लस बालकास देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा डॉक्टर सचिन पाटील यांनी आवाहन केले आहे.