सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडीच्या मोती तलावात आज दुपारी पोलीस विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने प्रात्यक्षिक करत “जर का अचानक चक्रीवादळ अथवा पाऊस आल्यास आम्ही सज्ज आहोत” अशी सलामी दिली. हे रंगीत तालीम असली तरी आपत्ती व्यवस्थापनाकडे कुठल्या सुविधा आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यात आली. कोण कोण किती वेळात पाण्यात उडी मारून लोकांचे जीव वाचू शकतो याची खातरजमा यावेळी करण्यात आली. सावंतवाडी मोती तलावात अचानक पोलिसांची टीम आपले किट घेत पाण्यात उडी घेत होते, हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोती तलावात झाले तरी काय कोणी आत्महत्या केली काय कोण बुडाला का अशी चर्चा होती. पण तालुक्यात कुठे पूरस्थिती ओढवल्यास कशी धाव घेता येईल आणि लोकांचे जीव वाचवता येतील याचं प्रात्यक्षिक व ट्रेनिंग आज मोती तलावात पोलीस आपत्तीवर टीमने केलं.