सावंतवाडी:
लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांनी एस. टी. प्रवासाठी स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहेत, त्यांची कार्ड सावंतवाडी आगाराकडे उपलब्ध झाली आहेत. ती कार्ड 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी न्यावीत, असे आवाहन स्थानकप्रमुख व्ही. एन. शेवाळे यांनी केले आहे. यावेळी नेंदणी पावतीसोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
1 डिसेंबरपासून नवीन स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्वतः व्यक्ती, आधारकार्ड, ओटीपीसाठी स्वतःच्या नावे असलेला मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच पंच्चावन्न रूपये शुल्क आकारले जाणार आहे. या योजनेचा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानकप्रमुख शेवाळे यांनी केले आहे.
वस्तीच्या चालक-वाहकांना गावात सुविधांचा अभाव
सावंतवाडी आगारातून काही प्रमाणात वस्तीच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु गावात चालक-वाहकाना पाणी, बाथरूम आदी सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱयांच्या आगारकडे तक्रारी केल्या आहेत. जो पर्यंत गावात सुविधा मिळत नाही, तो पर्यत कर्मचाऱयांनी वस्तीच्या गाडय़ांवर डय़ुटी बजावण्यास नकार देतात. त्यामुळे गावात सुविधा उपलब्ध करून वस्तीच्या गाडय़ा सुरळीत ठेवण्याबाबत सहकार्याची अपेक्षा स्थानक प्रमुखांनी केली.