अकरापैकी आठ ग्रामपंचायतींवर विजय : शिवसेनेच्या ताब्यातील सात ग्रामपंचायतींवर कब्जा
कोलगाव, आंबोली, चौकुळ, दांडेली, मळगाव, मळेवाड भाजपकडे
आरोस, तळवडे, आरोंदा शिवसेनेकडे
इन्सुलीत शिवसेना-भाजपला समसमान जागा
डिंगणे ग्रामविकास आघाडीकडे
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तालुक्यात भाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत त्यांच्या ताब्यातील सात ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. तालुक्यात अकरापैकी आठ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. तर आरोंदा, आरोस या ग्रामपंचायती शिवसेनेने आपल्याकडे राखण्यास यश मिळविले.
तळवडेत शिवसेनेने भाजपला धक्का देत या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला. तालुक्यात कोलगाव, मळेवाड, आंबोली, चौकुळ, दांडेली, डिंगणे इन्सुली, मळगाव ग्रामपंचायतीवर भाजपची तर आरोंदा, तळवडे, दांडेलीत शिवसेनेची सत्ता आली. तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोलगावमध्ये पंचायत समिती माजी सदस्य महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पंधरापैकी दहा जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले. तर मळेवाडमध्ये भाजपच्या हेमंत मराठे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलेने अकरापैकी नऊ जागा जिंकत बहुमत मिळविले.
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांची 25 वर्षांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दत्तू नार्वेकर यांच्या सहकार्याने आंबोलीत भाजपने शिवसेनेकडून सत्ता हस्तगत केली. मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची सासरवाड असलेल्या दांडेलीतही भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. तेथे सातपैकी सहा जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या मुसंडीने शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना धक्का बसला आहे. त्यांना असलेल्या ग्रामपंचायतीही राखता आल्या नाहीत.
सावंतवाडी 11 ग्रामपंचायतीच्या 119 जागांसाठी 265 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी तहसीलदार कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.
कोलगावात भाजपची मुसंडी
कोलगावात शिवसेनेची सत्ता होती. जि. प. सदस्य मायकल डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने माजी पं. स. उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखालील ही ग्रामपंचायत खेचून आणली होती. डिसोझा यांनी सारंग यांचा जि. प. निवडणुकीत पराभव केला होता. सारंग यांच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. सारंग यांना शिवसेनेत घेण्यासाठी केसरकर उत्सुक होते. परंतु त्यांना विरोध झाला. त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली. या काळात कोलगावची सत्ता गेल्याने जोपर्यंत सत्ता आणत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीत पाऊल न ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, आता त्यांनी कोलगाव ग्रामपंचायतीत कमबॅक केले. पक्षांतर्गत हितशत्रूंशी सामना करत त्यांनी निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेचे जि. प. सदस्य मायकल डिसोझा आणि पं. स. सदस्य मेघ:शयाम काजरेकर यांना जोरदार धक्का दिला. कथित जादुटोण्याच्या प्रकाराने चर्चेत आलेल्या या ग्रामपंचायतीवर भाजपच्या सत्तेचे सारंग किंगमेकर ठरले. मायकल डिसोझा यांचे बंधू थॉमस आणि मेघ:श्याम काजरेकर यांच्या पत्नी रश्मी यांनाही पराभव पत्करावा लागला.
कोलगाव निकाल : प्रभाग एक- प्रतीक्षा कृष्णा धुरी ( विजयी, 430) समीक्षा बटवलकर (412), संतोष नारायण राऊळ (विजयी 475) कुलदीप अरुण गावडे (345) आशिका अशोक सावंत (विजयी 478) सरिता हरिश्चंद्र सावंत (350). प्रभाग दोन – रोहित भाऊ नाईक (विजयी 331) रामचंद्र भिकाजी राणे (272) शिवदत्त घोगळे (विजयी 343) संदीप प्रकाश सावंत (260), गौरी गोविंद करमळकर (विजयी 316) कस्तुरी का. नाईक (288).
प्रभाग तीन – प्रणाली विजय टिळवे (विजयी 624), निशा शशिकांत पडते (549), संदीप लवू हळदणकर (विजयी 542), थॉमस डिसोझा (489), अनंत राऊळ (167), रसिका रामचंद्र करमळकर (विजयी 552), योगिनी योगेश करमळकर (425), शीतल टिळवे (219).
प्रभाग चार- आत्माराम अंकुश चव्हाण ( विजयी 279), बाबुराव चव्हाण (167), गौरव जाधव (48), दिनेश सारंग (विजयी 340), रश्मी काजरेकर (162), हेमांगी हेमंत मेस्त्राr (विजयी 288), प्रतिभा म्हापसेकर (143), संजना जाधव (66).
प्रभाग पाच- संदीप वसंत गवस (विजयी 238), निनाद पटवर्धन (150), रुपेश कुडतरकर (89), मारिया रुजाय डिमेलो (विजयी 243), संयोगिता उगवेकर (241), संदेशा वेंगुर्लेकर (227).
दांडेलीत भाजपचा डंका
दांडेलीत भाजपने सातपैकी सहा जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता आणली. भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांची सासरवाड असलेल्या गावात भाजपने शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. येथे शेलार
प्रचारासाठी आले होते. नवख्या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली. बीएस्सी (बॉटनी) पदवी मिळविलेल्या रिचा शेटये यांच्यासह सर्व युवा उमेदवार निवडून आले. भाजपचे युवा पदाधिकारी अमोल आरोसकर, संदीप माणगावकर हे विजयाचे शिल्पकार ठरले. युवा सेनेचे योगेश नाईक, तानाजी खोत पराभूत झाले. शिवसेनेचे माजी सरपंच महादेव पांगम यांच्या पत्नी उमा या एकमेव विजयी झाल्या.
प्रभाग 1 -सत्यनारायण माणगावकर (विजयी 153), योगेश नाईक (119), नीलेश मेघ:श्याम आरोलकर (विजयी 136), श्रीकृष्ण पुनाळेकर (58), तानाजी खोत (90), प्रतीक्षा खरात (विजयी 170), वर्षा मालवणकर (103).
प्रभाग दोन-कृष्णा पालयेकर (विजयी 129), नारायण मोरजकर (69), रिचा विलास शेटये (विजयी 142), विणाली नाईक (58), प्रभाग तीन प्रफुल्लता चंद्रशेखर मालवणकर (विजयी 140), दीप्ती दिगंबर दाभोलकर (111), उमा महादेव पांगम (विजयी 143), रचना माणगावकर (108).
आरोसमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता
आरोसमध्ये सातपैकी सात जागा शिवसेनेने जिंकल्या. शिवसेनेच्या अक्षता आनंद मेस्त्राr, मनीषा परब बिनविरोध निवडून आल्या. पाच जागांवर निवडणूक झाली. त्यात शिवसेनेने बाजी मारली. प्रभाग एक- विश्वजीत बाबुराव कळंगुटकर (विजयी 219), परेश रवींद्र पटेकर (188), प्रसाद जयराम नाईक (विजयी 209), केशव दशरथ नाईक (195), मोहिनी मोहन नाईक (विजयी 229), उज्ज्वला लवू नाईक (175), शंकर विष्णू नाईक (विजयी 143), सुधीर नारायण नाईक (117), सरिता संतोष नाईक (विजयी 145), रुक्मिणी कृष्णा बिर्जे (115).
मळगावात भाजपची मुसंडी
मळगावात शिवसेनेची सत्ता होती. येथे भाजपने 13 पैकी सात जागा जिंकत शिवसेनेकडून सत्ता हस्तगत केली. भाजपचे निरीक्षक प्रमोद गावडे, माजी सरपंच गणेश पेडणेकर, राजू परब यांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रचाराने येथे भाजपने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना येथे धक्का बसला. मळगावात शिवसेनेचे दिलीप सोनुर्लेकर यांच्या निधनानंतर येथे शिवसेनेला मार्गदर्शक नसल्याने फटका बसला. मळगावात सलग सहावेळा निवडून येण्याचा अनोखा विक्रम आनंद देवळी यांच्या नावावर जमा झाला आहे. त्यांनी डबल हॅट्ट्रिक केली.
प्रभाग एक – आनंद देवळी (विजयी 286), गुरुनाथ गावकर (257), नीलेश चव्हाण (205), प्रेमनाथ लक्ष्मण राऊळ (विजयी 270), संजय लक्ष्मण धुरी (262) विश्वनाथ राऊळ (31), स्नेहल उदय जामदार (विजयी 229), वैष्णवी राणे (217), मयुरी शिरोडकर (186). प्रभाग दोन- रत्नमाला आपा तळकटकर (विजयी 211), निकिता सावळ (208), निकिता निळकंठ बुगडे (विजयी 251), मृणाली लातये (169). प्रभाग तीन- हनुमंत बाबुराव पेडणेकर (विजयी, 367) विजय हरमलकर (186), निकिता नीलेश राऊळ (विजयी, 317), श्रेया राऊळ (232). प्रभाग चार- अनुजा अजित खडपकर (विजयी, 227), रागिणी शिरोडकर (161), वेदिका शिरोडकर (166), लक्ष्मण केशव गावकर (विजयी, 156) सिध्देश तेंडोलकर 138, सुरेश कानसे 103, रामदास राऊळ 89, साईप्रसाद खडपकर 81, सुभद्रा राणे (विजयी, 260), सुजाता महाले (255).
डिंगणेत ग्रामविकास आघाडी, पण…
डिंगणेत ग्रामविकास आघाडीने नऊपैकी नऊ जागा मिळविल्या आहेत.
ग्रामविकास आघाडीने सत्ता मिळवली असली तरी या ठिकाणी भाजपचे प्रमोद कामत, देविदास नाडकर्णी हे नेतृत्व करत असल्याने येथे भाजपची सत्ता बसणार आहे. ग्रामविकास आघाडीचे आरोही अमित गवस, संजय बाबुराव जोईल, शैला प्रविण नाडकर्णी ऋतुजा रमाकांत नाडकर्णी, आदेश काशिराम सावंत बिनविरोध निवडून आले. प्रभाग एक – संजय अर्जुन डिंगणेकर (विजयी, 208), सागर डिंगणेकर 106, प्रभाग 3 – जयेश कृष्णा सावंत (विजयी, 186), नीलेश सावंत (85), गीता एकनाथ सावंत (विजयी, 197), शालन संजय सावंत (विजयी, 184) नेहा नीलेश सावंत (99).
आंबोली, चौकुळ भाजपकडे
महत्वाच्या आंबोली आणि चौकुळ ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकविला. आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी या ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या होत्या. कबुलायतदार गावकर जमीनप्रश्न आणि पर्यटन विकास या दोन मुद्यांवर ही निवडणूक रंगतदार झाली. आमदार केसरकर यांचे कट्टर समर्थक तथा माजी सरपंच दत्तू नार्वेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपची कास धरली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. माजी सरपंच गजानन पालेकर आणि जि. प. माजी सभापती आत्माराम पालेकर या बंधूंचा करिष्मा निकालात दिसून आला. गतवेळी शिवसेना 6 आणि भाजप 5 असे चित्र होते. ते पालटून आता भाजप सहा आणि शिवसेना पाच असे समीकरण झाले आहे. शिवसेनेच्या जि. प. सदस्या रोहिणी गावडे यांचे पती विद्यासागर गावडे यांनी बंडखोरी केल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. सौ. गावडे यादेखील अलिप्त राहिल्या.
प्रभाग एक- छाया सुनील नार्वेकर (विजयी, 240), निकिता सिद्धेश भिसे (174), वैजयंती मनोहर गावडे (125), केशव दत्ताराम जाधव (48), काशिराम मालू राऊत (विजयी, 197) विद्यासागर गावडे (48). निधी निखिल गुरव (253, विजयी), नमिता ज्ञानेश्वर राऊत (162). अनिल जनार्दन चव्हाण (118), अरुण जनार्दन चव्हाण (27), नारायण शांताराम चव्हाण (266), शंकर धोंडी चव्हाण (विजयी, 337). बबन वसंत गावडे (364), सदाशिव ऊर्फ दत्तू नार्वेकर (381, विजयी). स्वप्निता गजानन करपे (369), प्रतीक्षा प्रकाश भिसे (366).
प्रभाग 3 – उत्तम अरविंद नार्वेकर (216), महेश वासुदेव पावसकर (24। विजयी), सारिका संदीप गावडे (विजयी, 242), कांचन उत्तम पारधी (213).
प्रभाग 4 – सावित्री वामन पालेकर (359, विजयी), रविना प्रवीण आवटे (214). अनिल भिवा नाटलेकर (63), गजानन वामन पालेकर (297, विजयी), बुधाजी शंकर पाताडे (232), प्रभावती महादेव गावडे (254), साक्षी संतोष गावडे (324, विजयी).
भाजपचे प्रकाश गावडे, उल्हास गावडे, महेश पावसकर, उदय आंबुलकर, नाना कदम, बाळा सावंत, रामभाऊ गावडे, आत्माराम पालेकर, संदीप गावडे, नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक यांनी आंबोलीत विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेने शशिकांत गावडे, उत्तम पारधी, सुनील नार्वेकर यांनीही चांगली मेहनत घेतली होती.
चौकुळला 11 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात होते. भाजपचे सहा तर शिवसेनेचे पाच उमेदवार विजयी झाले. माजी सरपंच विजय गावडे हे तीनवेळा विजयी झाले आहेत. चौकुळमध्ये माजी सरपंच गुलाब गावडे, भाऊ जाधव यांच्यामुळे भाजपला यश मिळाले. शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला.
प्रभाग एक – अभिजीत मेस्त्राr (306, विजयी), रामचंद्र वसंत जाधव 128, संजय लक्ष्मण पाटील 38. गोविंद गावडे 40, विजय गावडे (313,विजयी), संतोष वसंत परब 114. अनुराधा गावडे 165, वैष्णवी गावडे (292, विजयी).
प्रभाग 2- आरती प्रशांत जाधव 177, विजयी, आयेशा अभिजीत मेस्त्राr 172. अरुण आबा गावडे 143, सुरेश लक्ष्मण गावडे 61, सुरेश विष्णू शेटवे 158, विजयी. लीना गावडे 230,विजयी, शीतल सत्यवान गावडे 108, स्मिता सुभाष गावडे 18.
प्रभाग 3 – अरविंद शांताराम जाधव 171, सीताराम नामदेव चव्हाण 231, विजयी. मेघा महादेव मेस्त्राr 228,विजयी, रसिका रामचंद्र जाधव 169.
प्रभाग चार- गुलाबराव गावडे 448, विजयी, तुकाराम गावडे, 240. काव्या गावडे 318, संजना गावडे 467, विजयी, संजना संतोष गावडे 381, लता पाटील 209.
इन्सुलीत अपक्षाच्या हाती सत्तेची चावी
इन्सुलीत शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढाई झाली. 11 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात होते. सभापती मानसी धुरी, माजी जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य नारायण राणे हे दोन्ही पक्षात स्थानिक मातब्बर नेते होते. इन्सुलीत शिवसेनेची सत्ता होती. मात्र, भाजपने शिवसेनेला दणका दिला. भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी झाली होती. भाजपचे स्वागत नाटेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, नाटेकर यांनी शिवसेनेचे नारायण राणे यांचे सुपुत्र साईप्रसाद राणे यांना पराभूत केले. शिवसेना आणि भाजपला
प्रत्येकी पाच जागा मिळाल्याने नाटेकर यांच्या हाती सत्तेची चावी आहे. इन्सुलीत राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब प्रचारात उतरले होते. आमदार दीपक केसरकर यांनीही प्रचार केला. आता सरपंचपद आरक्षणानंतरच नेमकी कोणाची सत्ता, हे स्पष्ट होणार आहे. सभापती मानसी धुरी यांचे पती महेश धुरी यांना पराभूत व्हावे लागले. तर माजी पोलीस पाटील कृष्णा सावंत यांनी दुसऱयांदा विजय मिळविला. नारायण राणे आणि मानसी धुरी या दोघांना धक्का बसला आहे.
प्रभाग 1- सिद्धेश कुडव 124, राम पेडणेकर 47, सदाशिव राणे 291, गंगाराम ऊर्फ तात्या वेंगुर्लेकर 348, विजयी, अमित सावंत 131. राधिका देसाई 420, विजयी, दर्शना परब 196, मंगल माळकर 131, मिलन रॉड्रिक्स 177.
प्रभाग 2- दत्ताराम खडपकर 505, विजयी, दत्ताराम पेडणेकर 375. स्वागत नाटेकर 335,विजयी, नितीन राऊळ 301, अभय राणे 36, साईप्रसाद राणे 225. प्रिया कोठावळे 145, श्रेया भिसे 225, वर्षा सावंत 510 विजयी.
प्रभाग 3 – माजी सरपंच पूजा पेडणेकर 272, विजयी, स्नेहा शिंदे 247. गंगाराम कोठावळे 132, कृष्णा सावंत 219, विजयी, प्रताप सावंत 177. समिधा कोठावळे 233, नमिता नाईक 283 विजयी.
प्रभाग 4 – सविता चव्हाण 99, रेश्मा नाईक 270, सोनाली मेस्त्राr 338, विजयी. संदीप कोठावळे 162, रामचंद्र उर्फ काका चराटकर 286, विजयी, महेश धुरी 275. आरती परब 361, विजयी, दीप्ती सावंत 345.