गेल्या आठवडय़ात निफ्टीत 94 अंकांची तर सेन्सेक्समध्ये 329 अंकांची तेजी दर्शवली गेली. कोरोनाचे भय असतानाही आता बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. ते सुरळीत व्हायला काही कालावधी जावा लागेल. पण आता अनिश्चतिता हळूहळू कमी होऊ लागली आहे. पण म्हणून शेअर बाजारात सर्व काही आलबेल आहे असे नाही. गेल्या आठवडय़ात शेअर बाजाराला वास्तवाची जाणीव झाली आणि तो कोसळला, पण काहीसा सावरला. आता पुढच्या आठवडय़ात त्याची वाटचाल कशी असेल याकडे सगळय़ांचे लक्ष आहे.
गत आठवडय़ात शेअर बाजाराला जणू वास्तवाची जाणीव झाली आणि तो कोसळला. पण त्यानंतर तो काहीसा सावरला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अगदी स्वस्त दरात केलेल्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजार सावरला. सध्या अनेक क्षेत्रांत अती तेजी झाल्यामुळे थकल्याची भावना निर्माण झाली. विशेषत: फार्मा म्हणजे औषध क्षेत्रात तेजीचा एका अर्थाने अतिरेक झाला. कोविड-19वरील औषधे ग्लॅनमार्क आणि सिप्ला या कंपन्यांनी बाजारात आणली. त्याचबरोबर औषधांच्या निर्यातीवरील बंधनेही सरकारने काहीशी सैल केली. याचा परिणाम फार्मा क्षेत्रात तेजी येण्यात झाला.
थोडक्मयात खरेदीदारांची औषध कंपन्यांचे शेअर खरेदी करता करता दमछाक झाली आणि म्हणून बाजारात एक प्रकारे कन्सॉलिडेशन म्हणजे गोळाबेरीज होत झाली आहे. आता पुढील आठवडय़ात येणारे तिमाहीचे आकडे जर या तेजीला धरून नसतील तर शेअरबाजारात पुन्हा पडझड सुरू होईल. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही उपाययोजना जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळेही शेअर बाजारात तेजी टिकून राहील अशी अपेक्षा काही जणांना वाटते.
पण जागतिक स्थिती तितकीशी उत्साहवर्धक नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मिटलेला नाही, उलट वाढलेला आहे. आता तर अमेरिकेने चीनच्या आक्रमकतेला त्रासलेल्या आग्नेय आशियातील देशांना सैनिकी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनदरम्यानचा तणावही कमी झालेला नाही. या संघर्षांचे रूपांतर थेट युद्धात होण्याची शक्मयता खूपच कमी आहे. कारण सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना युद्ध करणे कुणालाच परवडणारे नाही. चीन तर कोविड-19 मुळे संपूर्ण जगात खलनायक ठरला आहे. त्याला आपली प्रतिमा उंचावण्याची आवश्यकता आहे. त्या देशाला जर आर्थिक फटका बसला तर चीनच्या अंतर्गत राजकारणावर तेथील सत्ताधाऱयांना नियंत्रण ठेवणे शक्मय होणार नाही.
त्यातच गेल्या काही आठवडय़ांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी कदाचित पहिल्यांदाच डिझेल आणि पेट्रोलचे भाव जवळजवळ सारखे झाले आहेत. इतकेच नाही तर डिझेलचे भाव पेट्रोलच्या दरापेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूक आणि मालवाहतुकीला आणखी अडचण निर्माण झाली आहे. कोविड-19 मुळे वाहतूक ठप्पच झाली आहे. आता मालवाहतूक सुरू झाली आहे. पण पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. आता मालवाहतुकीसाठी ट्रक तर आहेत पण चालक नाहीत अशी स्थिती आहे. या दरवाढीचा या क्षेत्रावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने महागाई वाढणार आहे. आता रिझर्व्ह बँकेने जर रेपो दरात कपात केली तर या महागाईवर नियंत्रण आणण्यात काही प्रमाणात यश मिळेल. महागाई वाढली तर लोकांची क्रयशक्ती कमी होईल आणि हे चांगले लक्षण नाही. थोडक्मयात, कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन हळूहळू सुरळीत होत असल्याचे दिसत असले तरी धोका अजून टळलेला नाही. देशातील कोविड रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तरीही बहुतांश क्षेत्रे खुली करण्यात आली असून अर्थव्यवहार सुरूही झाले आहेत. पण साशंकता अजूनही आहे. निफ्टीत 10,550 वर मोठा अडथळा येऊ शकतो. हा टप्पा पार केला तर निफ्टीचा कल तेजीकडे जाईल. पण ही तेजी मर्यादित असेल.
– संदीप पाटील,
शेअरबाजार अभ्यासक