प्रतिनिधी/ मडगाव
एका सासष्टी तालुक्यात दर वर्षी किमान दीड ते दोन हजार जण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारत असल्याचे एका पहाणीत आढळून आले आहे. देशात सद्या नागरिकत्वाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱयाची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे.
हाती आलेल्या माहिती प्रमाणे, सासष्टीतील कोलवा, बाणावली, माजोर्डा, नुवे, लोटली, कुडतरी, राय, नावेली, कुंकळळी, वेळळी इत्यादी भागातील लोकांकडून मोठय़ा प्रमाणात पोर्तुगीज पासपोर्ट केला जातो. पोर्तुगीज पासपोर्ट करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले जाते व भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला जातो. सद्या गोव्यात सद्या चांगली नोकरी मिळणे कठीण होऊन बसलेले आहे. त्यामुळे विदेशात जाणाऱयांची संख्या दिवसेन दिवस वाढ आहे. धड चांगली नोकरी नाही किंवा धंदा नाही. त्यामुळे भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱयाची संख्या वाढत आहे.
दिवसाला सरासरी सहा ते सात जण पोर्तुगीज पासपोर्ट साठी अर्ज करतात. ही संख्या नक्कीच गोव्यासाठी चिंतेची बाब असली तरी सरकार या विषयाकडे गांभीर्याने पहात नाही. त्याच बरोबर कायदय़ाने यावर बंदी देखील घालता येत नाही. आजवर अनेकांनी विदेशात प्रयाण केले असून नोकरी, धंदा, शिक्षण इत्यादी त्याच ठिकाणी घेतले जाऊ लागलेय.
पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज करणाऱयांची संख्या मोठी आहे. पोर्तुगीज पासपोर्ट केल्यास युरोपमधील एकूण 22 देशात ‘व्हिसा’ नसताना प्रवास करणे शक्य असते. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट करणाऱयांची संख्या ही मोठी असते. सासष्टी पाठोपाठ तिसवाडी व बार्देश तालुक्याचा पोर्तुगीज पासपोर्ट करून घेणाऱयामध्ये समावेश होत आहे. पोर्तुगीज पासपोर्ट केल्यावर भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला जातो. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करताना, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड इत्यादी सरकारला परत करावे लागते.
एका बाजूने नागरिकत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱयांना कोणी रोखू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. केवळ गोव्यातीलच नव्हते तर आत्ता शेजारील कर्नाटक, महाराष्ट्र, त्याच बरोबर छत्तीसगड, बिहार, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील लोक गोव्यात येऊन पोर्तुगीज पासपोर्ट करू लागले आहेत. त्यासाठी येथील भाडेकरू म्हणून एखाद्या पत्ता दिला जातो व घर मालकाचा ना हरकत दाखला. आज पासपोर्ट सहजरित्या उपलब्ध केला जात असल्याने तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्याने, पासपोर्ट करणाऱयांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे.