प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस शनिवारी मुंबई येथे साजरा झाला. या कार्यक्रमाशी थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोडले गेले होते. कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. थेट प्रक्षेपणाद्वारे कोल्हापूरातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी 2009 ची विधानसभा निवडणूक, तत्कालिन जातीय दंगलीची परिस्थिती आणि आपल्या विजयानंतर शरद पवार यांना झालेला आनंद याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांचा कंठ दाठून आला. भावूक झालेल्या मुश्रीफ यांना पाहून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भावनिक झाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही कोल्हापूरकर म्हणजे पवार साहेबांच्या आजोळची माणसे आहोत. आपल्या आजीच्या हाताला धरून ते वाढलेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आजोळच्या शुभेच्छा नेहमीच आहेत. पवार यांच्या 55 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांना देशातील एकही प्रश्न माहिती नाही असे कधीच झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जाती, धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच पद्धतीने शरद पवार यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन पक्षीय वाटचाल केली. यापुढील काळात दिल्लीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची आम्ही शपथ घेतो.
....अन् मुश्रीफ गहिवरले !
पवार यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात संधी दिल्याबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले. 2009 मध्ये मिरजमध्ये मोठी जातीय दंगल झाली. या दंगलीच्या परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते पराभूत झाले. पण त्यावेळी मी सुमारे 50 हजारांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आल्याबद्दल यावेळी पवार यांनी आनंद व्यक्त केला. पण मला सर्वात जास्त आनंद झाला असेल तर तो हसन मुश्रीफसारखा अल्पसंख्यांक उमेदवार निवडूण आल्याबद्दल असे पवार यांनी स्पष्ट केले होते. माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि अल्पसंख्यांक कार्यकर्त्याला पवार यांनी पाठींबा दिल्याचे सांगताना मुश्रीफ यांना गहीवरून आले. अशा आवस्थेतच `साहेब तुम्हाला दिर्घायुष्य लाभो ! असे म्हणत मुश्रीफ यांनी मनोगत थांबवले.
यापुढेही ते राज्य आणि देशाची कणखरपणे सेवा करतील !
शरद पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये आजतागायत अनेक अमूल्य कामे करून विक्रम नोंदवला आहे. यापुढेही ते वयाची शंभरी पार