प्रतिनिधी/ सातारा
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सुचनेनुसार जिह्यातील सर्वच अवैद्य व्यवसायांवर छापेमारी गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. त्यामध्ये सातारा शहर, शाहुपूरी आणि सातारा तालुका पोलिसांनी समिर कच्छी, यासिन शेख आणि चोरगे या तिघांच्या अड्डय़ावर छापासत्र केले आहे. अनेकांच्यावर गुन्हे दाखल केले असून हजारो रुपये त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत. या कारवायामुळे बुकी मात्र घरी आणि एजंट पोलिसांच्या हाती असा प्रकार सुरु आहे.
सातारा जिह्यात मटका मोठय़ा प्रमाणावर सुरु आहे. त्याचे सर्व पत्ते पोलिसांनाही चांगले ज्ञात आहेत. मटक्याचे आकडे घेणारे बुकी फंटरला नेमून आपला कारभार करत असतात. सातारा शहरात समीर कच्छी, यासिन शेख, चोरगे या तिघांचे अड्डे ठिकठिकाणी आहेत. त्यावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामध्ये सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परज येथे परदेशी वखारीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जयवंत शिवराम माने (वय 56, रा. लक्ष्मी टेकडी), अतुल नंदकुमार बल्लाळ (वय 38, रा, दाधमे कॉलनी करंजे), यासिन शेख (रा. गुरुवार परज) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून 12 हजार 430 रुपयांचे जुगाराचे साहित्य व एक मोबाईल हस्तगत केला.
गुरुवार परज येथील पिंपळाच्या झाडाच्या खाली पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सोमनाथ शिवराम यादव (वय 31, रा. मंगळवार पेठ झोपडपट्टी), यासिन शेख (रा. गुरुवार परज) याच्यावर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व मोबाईल असा 6 हजार 180 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. तसेच कोडोली गावच्या हद्दीत धनगरवाडी जाणाऱया रस्त्यालगत निळे पडदे लावलेल्या टपरीच्या आडोशाला चालणाऱया मटका अडय़ावर कारवाई केली. त्यात विकास राऊ काकडे (वय 61, रा. कर्मवीरनगर), यासिन दिलावर शेख (रा. तेलीखड्डा) याच्यावर कारवाई करुन त्याच्या ताब्यातून 1924 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
तसेच प्रिती हॉटेलच्या पाठीमागे टपरीत चालणाऱया अड्डय़ावर छापा टाकून सचिन मुकूंद सावंत (वय 42, रा. धनगरवाडी), चंदू चोरगे (रा. रविवार पेठ) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व मोबाईल असा सुमारे 2 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. वाढे फाटा येथे शिवतेज हॉटेलच्या आडोशाला जुगार अड्डय़ावर कारवाई केली. त्यामध्ये अशोक नामदेव खरात (वय 48, रा. साईनिवास) याच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 2950 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्याचा मालक समीर कच्छी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सेव्हन स्टार बिल्डींग परिसरात एमएच 11 चायनिज सेंटरच्या समोरील मोकळया जागेत जुगार अड्डय़ावर कारवाई केली. त्यामध्ये दशरथ सखाराम फरांदे (वय 69, रा. गडकर आळी), यासिन शेख (रा. गुरुवार पेठ), सोमनाथ चोरगे (रा. रविवार पेठ) यांचा समावेश असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 14 हजार 892 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. कोडोली बसस्टॉपजवळील टपरीच्या आडोशाला दत्तात्रय उत्तम घोरपडे (रा. श्रीकृष्ण कॉलनी), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 1210 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
लक्ष्मी टेकडी येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला जुगार अड्डय़ावर कारवाई केली. त्यात विकास नारायण जाधव (वय 21, रा. लक्ष्मीटेकडी), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 2050 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. कोडोली येथील बसस्टॉपच्या पाठीमागे जुगार अड्डय़ावर कारवाई करण्यात आले. त्यात अशोक रामलिंग काळे (वय 53, रा. कोडोली), समीर कच्छी (शेख) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 1460 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच शिवराज पेट्रोल पंपाच्यासमोर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार अड्डय़ावर कारवाई केली. त्यामध्ये अक्षय संजय साळुंखे (वय 29, रा. संभाजीनगर), निकेतन किशोर पिसाळ (वय 30, रा. करजे पेठ), इब्राहिम इमामसाब मुजावर (वय 45, रा. आहिरे कॉलनी), संजय मारुती जगदाळे (वय 53, रा. संभाजीनगर), गंगाराम महादेव आंबुरे (वय 35, रा. खंडोबाचा माळ, संभाजीनगर), बळीराम शंकर जाधव (वय 52, रा. गणेशवाडी, ता. सातारा), चंद्रभूषण अवतकुमार गौड (वय 35, रा. भरतगाव), तुळशीराम भिमराव घाडगे (वय 55, रा. कर्मवीरनगर), विठ्ठल सिद्धू गोळसकर (वय 52, रा. संभाजीनगर), राजेंद्र सिद्धया गुत्तेदार (वय 30, रा. श्रीनाथ कॉलनी), समाधान मच्छिंद्र मोरे (वय 35, रा. कुपर कॉलनी), नारायण इराप्पा बाळकुंद्रे (वय 38, रा. हॉटेल सुंदरबन), रवींद्र छट्टू यादव (वय 32, रा. पिरवाडी), हणमंत राजाराम घाडगे (वय 49, रा. खिंडवाडी) व समिर कच्छी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 43 हजार 290 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
क्षेत्रमाहुली येथील आयसीआयसी बँकेच्या आडोशाला जुगार खेळणाऱया अजय संतोष खंडझोडे (वय 22, रा. बुधवार पेठ), विनोद आनंदराव भोसले (वय 45, रा. क्षेत्रमाहुली), समीर सलिम कच्छी (रा. यश ढाब्याच्या पाठीमागे मोळाचा ओढा) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. नवीन एमआयडीसी येथे जुगार अड्डय़ावर कारवाई करुन विनायक राहुल कसबे (वय 22, रा. वनवासवाडी), शशिकांत सिद्धराम चव्हाण (वय 45, रा. महागाव), उदय सिताराम निघडे (वय 48, रा. महागाव), अल्लाबक्ष हाजिफ जमादार (वय 42, रा. गुरुवार पेठ), रवी प्रकाश सोनावणे (रा. नवीन एमआयडीसी) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 12 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. भिमाबाई आंबेडकरनगर कॉलव्याजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार अड्डय़ावर कारवाई केली. त्यात शरद नागू जाधव (वय 49, रा. लक्ष्मीटेकडी), हरिश्चंद्र सरन्नाप्पा नाटेकर (वय 28, रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी), समीर सलिम शेख (रा. एस. ढाब्याच्या पाठीमागे सैदापूर) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 2 हजार 32 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
कोडोली येथे गावच्या कमानीजवळ हिताची कंपनीच्या एटीएम शेजारी बोळात जुगार घेणाऱया महेश सुरेश साठे (वय 27, रा कोर्टी) हा आढळून आला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 1820 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून त्याचा मालक समीर कच्छी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच