कुडाळ/प्रतिनिधी-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केलेले आंदोलन आमदार प्रसाद लाड यांनी उधळून लावले आहे. त्यात नाना पटोले अक्षरशः तोंडावर पडले आहेत. आता नाना पटोले यांच्या पावलावर पाऊल ठेवून सिंधुदुर्गातील काँग्रेस उद्या केंद्रीय मंत्री राणे साहेबांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचे वृत्त हाती लागले आहे. सिंधुदुर्गातील काँग्रेसने नाना पटोले यांच्या नादी लागून असले नको ते धाडस करू नये अन्यथा राणे साहेबांचे व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते छातीची ढाल करून हे आंदोलन परतवून लावतीलच पण सिंधुदुर्गातील असलेली नसलेली काँग्रेस सळो की पळो करून नेस्तनाबूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.