नवे रुग्ण दोडामार्ग, कणकवली, देवगडचे : रुग्णसंख्या 121 वर
नवे रुग्ण
परमे-दोडामार्ग
कुरुंगवणे-कणकवली
धालवली-देवगड
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात आणखी तीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी आढळले. त्यामुळे ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 121 वर गेली आहे. नव्याने आढळलेले तीन रुग्ण दोडामार्ग, कणकवली आणि देवगड या तीन तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
रविवारी आढळलेल्या रुग्णात दोडामार्ग तालुक्यातील परमे गावातील एक, कणकवली तालुक्यातील कुरुंगवणे गावातील एक आणि देवगड तालुक्यातील धालवली गावातील एकाचा समावेश आहे. जिल्हय़ात एकूण रुग्णसंख्या 121 असून त्यातील 17 रुग्ण ‘कोरोना’मुक्त होऊंन घरी पाठविण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण मुंबईत उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे सध्या 101 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचाराखाली आहेत.
असे आहेत कंटेनमेंट झोन
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्यात पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोन आहेत. हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, कलमठ येथील जि.प. प्राथमिक शाळा, कुंभारवाडी, तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण.
वैभववाडी तालुक्यात भुईबावडा-बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, वेंगसर बंदरकरवाडी, तिरवडे तर्फ सौंदळ घागरेवाडी, कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि कोकिसरे गावातील पालकरवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत.
सावंतवाडी तालुक्मयात कारिवडे-गावठणवाडी, माडखोल-बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी, बांदा गवळी टेंबवाडी, असनिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
कुडाळ तालुक्मयात पणदूर-मयेकरवाडी, आंब्रड वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, पडवे-पहिलीवाडी, गावराई टेंबवाडी, रानबांबुळी पालकरवाडी, हिर्लोक गावखालची परबवाडी, साळगाव लुभाटवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत.
मालवण तालुक्यात चिंदर-देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत. वेंगुर्ले तालुक्यात मातोंड कंटेनमेंट झोन आहे. देवगड तालुक्यात शिरगाव धोपटेवाडी, नाद भोळेवाडी, नाडण मिराशीवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत.
2 हजार 453 अहवाल प्राप्त
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 564 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 453 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 121 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 2 हजार 332 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 111 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 121 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 76 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी 5 हजार 833 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिह्यातून सिंधुदुर्गात 2 मे 2020 पासून आजअखेर एकूण 77 हजार 278 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
‘कोरोना’संदर्भात सद्यस्थिती
1 -पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2564
2 -अहवाल प्राप्त झालेले नमुने 2453
3- आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 121
4 -निगेटिव्ह आलेले नमुने 2332
5 -अहवाल प्राप्त न झालेले नमुने 111
6 -सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 101
7 -डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 17
8 -मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
9- विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 121
10- रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 5833
11- निरीक्षणाखालील व्यक्ती 44637
12 -गृह विलगीकरणातील व्यक्ती 13399
13- संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 31787
14 -14 दिवसांचे विलगीकरण संपलेल्या व्यक्ती 20706
15 -रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण व्यक्ती 1329
16 -रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या व्यक्ती 1225
17 -जिह्यातील कंटेनमेंट झोन 61
18 -सक्रिय कंटेनमेंट झोन 57
19 -असक्रिय कंटेनमेंट झोन 4 20- 2 मे 2020 रोजी पासून जिह्यात आलेल्यांची संख्या -77278