भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची मागणी
वार्ताहर / वैभववाडी:
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असून अशा प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिह्यात सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना प्रशासनाने नेमणुका दिल्या आहेत. त्याचधर्तीवर प्रशासनाने सिंधुदुर्ग जिह्यात आदेश काढून तात्काळ सामुदाय आरोग्य अधिकारी (CHO) म्हणून डॉक्टरांची नियुक्ती करा, अशी मागणी वैभववाडी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सामुदाय आरोग्य अधिकारीपदाच्या तोंडी परीक्षा न झाल्याने डॉक्टरांच्या परीक्षेचा निकाल थांबविण्यात आला आहे. परंतु, या पदाची परीक्षा दिलेल्या डॉक्टरांना कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्यामध्ये निकाल थांबला असला तरी त्यांना नोकरीचे आदेश देऊन कामावर रुजू केले आहे. कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. इतर जिह्यात डॉक्टरांना दिलेल्या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग जिह्यात प्रशासनाने तात्काळ आदेश काढून डॉक्टरांना नोकरीत रुजू करावे. सद्यस्थितीत जिह्यात डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता आहे. जिह्यात सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टरांना नेमणुका दिल्यास आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे, असे निवेदनात नासीर काझी यांनी म्हटले आहे.
उंबर्डेत पाच डॉक्टरांची नियुक्ती करावी!
वैभववाडी तालुक्मयातही उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र विभागात जवळपास 16 हजार लोकवस्ती आहे. परंतु या केंद्रात केवळ दोन डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून या केंद्रात आणखी पाच डॉक्टरांची नियुक्ती करावी. जेणेकरून आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल, असे काझी यांनी म्हटले आहे.