वेंगुर्ले(वार्ताहर)-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांची प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काfमटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मान्यता दिल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे रिक्त असलेल्या अध्यक्ष पदावर नियमीत अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यत सदर पदाचा प्रदभार आपल्याकडे देण्यांत येत आहे. असे लेखी पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन संघटक सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी दि. 22 जुलै रोजी इर्शाद शेख यांना पाठविले आहे.