प्रतिनिधी / मालवण:
येथील रजत तोरस्कर आणि खुशी पेठे यांची 19 वर्षांखालील गटात सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघामध्ये निवड झाली आहे. नाशिक जीमखाना येथे 6 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱया 83 व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. खुशी 19 आणि 21 वर्षांखालील, तर रजत 19 तसेच 21 वर्षांखालील आणि पुरुष खुल्या गटातही खेळणार आहे. महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर यांनी रजत आणि खुशी यांचे अभिनंदन करून राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. bankofindia.com