वृत्तसंस्था/हॅम्बुर्ग
एटीपी टूरवरील हॅम्बुर्ग खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ग्रीसचा स्टिफेनोस सित्सिपस तसेच चिलीचा ख्रिस्टेन गॅरीन यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
सहाव्या मानाकित सित्सिपसने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या लेजोव्हिकचा 7-6 (7-5), 6-2 तसेच चिलीच्या गॅरीनने कझाकस्तानच्या बुबलीकचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. रूबलेव्हने ऍग्युटचा 6-2, 7-5 तसेच रूडने हंबर्टचा 7-5, 3-6, 6-1 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. सित्सिपस आणि गॅरीन यांच्यात उपांत्य लढत होईल.