प्रतिनिधी / पणजी
सिद्धकला तर्फे भरतनाटय़म कार्यक्रम शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ओ मेगी ओ माया एमपी थेटर बागा हर्फडे रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिद्धकला च्या संचालिका व नृत्यदिग्दर्शिका सौ जानवी बोंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या भरतनाटय़म व फ्य?जन नृत्य यांचा भरतनाटय़म चा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी2021 रोजी आयोजित केला आहे .या कार्यक्रमात भरत नाटय़म, फ्य?जन ,क्लासिकल व भारतीय संगीता वरती विविध क्लासिकल नृत्यशैली सादर करण्यात येतील भरतनाटय़म मधील शास्त्रीय प्रकार यात गणेश कौतुकम , शिव कीर्तन, कृष्णा स्तुति, कंटेम्पररी भरतनाटय़म शास्त्रीय व सेमी क्लासिकल यांची मेजवानी करण्यात येईल काही निवडक हिंदी सुफी भरतनाटय़म नृत्य वेगळा प्रयोग या नृत्यात कार्यक्रमात सादर होईल. कॉस्मिक भरत नाटय़म कार्यक्रमात
कुशल नृत्यांगणा आपली नृत्य शैली द्वारे आपली कला सादर करतील. भारत देशाचे हे प्राचीन नृत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हा मुख्य हेतू द्वारे कॉस्मिक भरतनाटय़म कार्यक्रमाचे द्वारेआयोजन करण्यात आला आहे. भरतनाटय़म नृत्य फक्त नृत्य प्रकारच नव्हे तर वेशभूषा दागिने आभूषणे व शास्त्रीय संगीत याचा ताल पकडून विविध मुद्रांवर तीही नृत्य सादर करणे व त्या नृत्य याद्वारे आनंद प्रेक्षकांना देणे ही खरी कल्पना आहे.