वार्ताहर / गोकुळ शिरगाव
युनिसेफ, भारतीय कृषी अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी, पुणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे, एम.एस.स्वामीनाथन संशोधन फाउंडेशनअंतर्गत पोषणमूल्य आधारित शेती पद्धती हा उपक्रम श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आला, हा उपक्रम कागल तालुक्यातील शेंडूर या गावामध्ये राबविण्यात आला. या कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ञ प्रतिभा ठोंबरे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह यांनी वेबिनारच्या माध्यमातून सादरीकरनाद्वारे दिली.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिरके यांनी सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कानेरीमठ यांनी शेंडूर गावामध्ये २०० पेक्षा जास्त कुटुंबियांच्या शेतावर परसबाग उभारून लॉकडाऊन (Covid-19) मध्ये सुद्धा पोषणमूल्य आधारित शेती पद्धती हा उपक्रम द्वारे चांगले कार्य केल्याबद्दल कौतुक केले. प्रत्येक शेतकरी कुटुंबियांना विविध प्रकारच्या म्हणजेच फळवर्गीय, पानवर्गीय, फुलवर्गीय, मूळवर्गीय अशा विविध प्रकारच्या भाज्यांमुळे शेतकरी कुटुंबाना संतुलित आहार मिळेल त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून महिलांमधील रक्ताशया सारख्या विविध रोगांना आळा बसणे शक्य आहे. आणि भाजीपाल्यावर होणारा खर्च सुद्धा कमी होईल अशी माहिती कु. प्रतिभा ठोंबरे यांनी वेबीनारच्या सदरीकारानाद्वारे माध्येमातून दिली. शेंडूर येथील शेतकरी सौ. सुरेखा परीट, सौ. लता परीट व श्री. विनायक शिंदे यांनी या उपक्रमाचा त्यांच्या कुटुंबाला झालेला फायदा, प्रत्येक कुटुंबाने आपआपल्या घरी सेंद्रिय पद्धतीने परसबाग उभारावी असा संदेश देऊन स्वताच्या अनुभव त्यांनी या राज्यस्तरीय वेबिनारमध्ये व्यक्त केला.
या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के, पी. विश्वनाथा, डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, भाकृअनुप-अटारी, पुणे संचालक डॉ. लाखन सिंह, युनिसेफचे सल्लागार डॉ. नागरगोजे, एम.एस.स्वामीनाथन संशोधन फाउंडेशनच्या संचालिका डॉ. भवानी, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिरके आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.