नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्लीत सीएनजीची (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) किंमत 2 रुपयांनी वाढवून 75.61 रुपये प्रतिकिलो केली आहे. या दरवाढीमुळे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 78.17 रुपये प्रतिकिलो, तर गुरुग्राममध्ये 83.94 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढली आहे. चालू आठवडय़ात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या रविवारीच सीएनजी दर दोन रुपयांनी वाढविण्यात आले होते. वाढीव दरांची अंमलबजावणी शनिवारपासूनच तातडीने लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने इंधनदरात कपात झाली आहे. साहजिकच आता सीएनजी दरांच्या वाढीलाही लगाम लागू शकतो. गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असताना सीएनजीचे दर वाढताना दिसत आहेत.