क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सीए इन्स्टिटय़ूट आयोजित क्रीडा स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे सीए एम. डी. चौगुले, शाखा चेअरमन नितीन निंबाळकर, सचिन खडबडी, पवन घाळी, राजेंद्र मुंदडा, विरण्णा मुरगोड, संजीव देशपांडे व प्रकाश तिगडी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. एम. डी. चौगुले यांच्याकडे क्रीडाज्योत सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर चौगुले यांनी क्रीडाज्योत उंचावून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले. यावेळी सीएचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.