ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) चे महासचिव सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशीष येचुरी यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळेे निधन झाले. गुरुग्राममधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी 6 वाजता उपचारा दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. सीताराम येचुरी यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष येचुरी यांनी कोरोनाची लागण झाली होती. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2 आठवड्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मेदांतामध्ये हलविण्यात आले. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. 34 वर्षीय आशीष हे दिल्लीतील एका वृत्तपत्रात सिनियर कॉपी एडिटर पदावर कार्यरत होते.