बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकात येण्यासाठी सीबीटी बसस्थानकासमोरील प्रवेशद्वार पादचाऱयांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर पादचाऱयांची वर्दळ वाढली आहे. बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. दोन्ही बसस्थानकांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून सीबीटीसमोरील प्रवेशद्वार बंद करून बस व प्रवाशांसाठी पर्यायी क्यवस्था म्हणून जुन्या पी. बी. रोडवर प्रवेशद्वार सुरू आहे. बसस्थानकाच्या मार्गावर उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे कामही पूर्णत्वाकडे आल्याने सीबीटीसमोरील प्रवेशद्वार पादचाऱयांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे खडेबाजारमधून बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना सोयीस्कर झाले आहे.
बसस्थानकात येणाऱया स्थानिक बसेस व लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या अधिक आहे. त्याबरोबरच पादचारी प्रवाशांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे आवार सतत गजबजलेला असतो. मात्र, बसस्थानकाच्या कामामुळे सीबीटीसमोरील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीसह प्रवाशांना जुन्या पी. बी. रोडवर उभारलेल्या प्रवेशद्वारावर ताण पडत होता. परिणामी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. मात्र, आता दोन्ही प्रवेशद्वारांतून पादचारी बसस्थानकात येत असल्याने सोयीस्कर झाले आहे. त्याबरोबरच खडेबाजारमधून येणाऱया पादचाऱयांना वळसा घालून बसस्थानकात यावे लागत होते. मात्र, आता जुने प्रवेशद्वार खुले झाल्याने पादचाऱयांना बसस्थानकात येणे सोपे झाले आहे.