नागरिकांची कसून चौकशी : कडक पोलीस बंदोबस्त, आरटीपीसीआर-कोरोना प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने वाहनधारकांसमोर अडचणी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ाच्या सीमाहद्दीवरील चेक पोस्टवर वाहनधारकांची मागील चार दिवसांपासून कडक तपासणी सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाहद्दीसह कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणारे वाहनधारक अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाहद्दीवर मागील काही दिवसांपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, केरळ राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे शासनाने सीमाहद्दीवर बंदोबस्त ठेवून कडक कारवाई सुरू केली आहे. राकसकोप, अतिवाड फाटा, शिनोळी फाटा, चलवेनहट्टी आदी ठिकाणी उभारलेल्या चेक पोस्टवर कडक तपासणी सुरू झाली आहे. मात्र वाहनधारकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शिवाय चंदगड तालुक्मयातून बेळगावात येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्हय़ाच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. चंदगड तालुक्मयातील सर्रास जनता ही वैद्यकीय उपचार व इतर कामासाठी बेळगाव शहराकडे येते. मात्र सीमाहद्दीवर नागरिकांना आरटीपीसीआर व कोरोना प्रमाण पत्र सक्तीचे करण्यात आल्याने वाहनधारकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बेळगावला दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ात महाराष्ट्र, गोवा राज्यातील नागरिकांची ये-जा सुरू असते. याकरिता बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील शिनोळी फाटय़ाजवळील सीमा हद्दीवर पोलीस पोलीस बंदोबस्त कडक ठेऊन वाहनधारकांना माघारी धाडले जात आहे.