ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय महिला कुस्तीपटू सीमा बिस्लाने 50 किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळवले आहे. बिस्लाने युरोपीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पोलंडच्या अन्ना लुकासियाक हिला 2-1 पराभूत करत हे तिकीट मिळवले.
वर्ल्ड ऑलिम्पिक रेसलिंग क्वालिफिकेशन इव्हेंटमध्ये तिकिट मिळवणारी बिस्ला ही दुसरी भारतीय ठरली आहे. यापूर्वी आशियाई चॅम्पयिनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या सीमा हिने बेलारूसच्या अनास्तासिया यानोतवा हिला 8-0 आणि 2018 मधील स्विडनची यूथ ऑलिम्पिक चॅम्पियन एम्मा जोन्ना मालमग्रेन हिला 10-2 असे पराभूत करुन पहिल्या चारमध्ये प्रवेश केला होता.