टेबल, स्वेटर, ज्युपिटर, लोनलीनेस, संडे, इंडोनेशिया अशी लोकंची नावे
जगभरात इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली आहे. आमच्या देशात इंग्रजी आणि चर्चित लोकांसाठी असे वेड आहे की अनेक लोक स्वतःच्या मुलांना त्यांचीच नावे देतात. मेघालयाच्या खासी हिल्स जिल्हय़ातील उमनिउ-तमर एलाका गावाच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.
या गावातील लोक स्वतःच्या मुलांना अशी नावे देतात, जी ऐकून तुम्हाला प्रारंभी धक्काच बसेल. येथील मुलांना इटली, अर्जेंटीना, स्वीडन आणि इंडोनेशिया अशी नावे दिली जातात. यातील अनेक लोकांना इंग्रजी बोलता येत नाहीत, परंतु ते स्वतःच्या मुलाचे नाव इंग्रजी शब्द आणि इंग्रजी बोलणाऱया देशांच्या नावावर ठेवतात.
महिलांची नावं
या गावातील काही अन्य नावे अधिकच चकीत करणार आहेत. महिलांची नावे प्रॉमिसलँड, होलिलँड, रिक्वेस्ट, लव्हलीनेस, युनिटी यासारखी आहेत. याचबरोबर भारत, मुमताज आणि दुर्गा यासारखी पारंपारिक नावे देखील वापरात आहेत. येथे टेबल, ग्लोब, व्हीनस, अरेबियन सी, पॅसिफिक सी आणि कॉन्टिनेंट देखील नावं आहेत. मुलांना संडे, मंडे, टय़ुजडे यासारखे दिवसांवर आधारित नावं देखील दिसून येतील. येथील एका मुलीचे नाव तिची आई स्वेटरने ‘आय हॅव बीन डिलिव्हर्ड’ ठेवले होते.
इंग्रजीबंद्दल प्रचंड आपुलकी
भारत-बांगलादेश सीमेवरील या गावात सुमारे 916 महिला आणि 850 पुरुष मतदार आहेत. येथील गावप्रमुखानुसार लोकांना इंग्रजीबद्दल अत्यंत प्रेम असल्याने निम्म्याहून अधिक लोकांना स्वतःच्या नावाचा अर्थच माहित नाही तसेच ते त्याबद्दल विचार देखील करत नाहीत. ऐकण्यास शब्द चांगले वाटत असल्यानेच युनिक नावं ठेवली जातात. येथील मुलांच्या नामकरणापूर्वी ते इंग्रजी शब्दात असावे याची काळजी घेतली जाते.
ग्रहांची देखील नावे
या गावात सौरमंडळातील 9 ग्रह देखील चालता-फिरताना दिसून येतील. कारण येथे ज्युपिटर, प्लुटो आणि मार्स प्लॅनेट नाव असलेले लोकही राहतात. फार इंग्रजी येत नसल्याने अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांना नकारात्मक नाव देखील आहेत. यात सॅडली, लोनलीनेस आणि अँग्री बर्ड यासारखी नावं अत्यंत मजेशीर आहेत.