प्रतिनिधी / कोल्हापूर
नवी दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. अंतिम परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागातून 177 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागात गोपेश दावडा याने प्रथम क्रमांक पटकावला. अपुर्वा हार्दीकर यांनी व्दितीय तर श्रुती शाह यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रतीक श्रीपन्नावार चौथा व कावेरी मिसाळ यांनी पाचवा क्रमांक मिळवला. यंदाही सी. ए. परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सी. ए. परीक्षेसाठी पहिल्या व दुसऱया ग्रुपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील मोहित मिरजकर, संजीवनी खुबचंदानी, रिया सिंधी, कृष्णात पाटील, श्रद्धा वाठारकर, कुमारी शीतल पाटील, आकाश बसंतानी, देशना दोशी , लकी खंडेलवाल, वीरेंद्र शाह, प्रणव कोडोलीकर, स्वप्नील भालेकर, तानाजी गडदे, मुकुल भिलले, निखिल देवणे, अपर्णा कालेकर, ओंकार लंबे , उत्कर्ष पागडे, नितीश वंदुरे-पाटील, बबन साबळे, सागर पाटील, मंगेश पारकर, देविका गांधी विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी स्वप्नील सादळे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांवर नातेवाईक, मित्र परिवारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावर्षी कोरोनाच्या काळातही बऱयाच अडचणींचा सामना करीत इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियातर्फे परीक्षेचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते. जगातील अवघड कोर्स आणि परीक्षा म्हणून चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच या परीक्षेच्या निकालाचा टक्का कमी असतो.
नियोजन व वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे
सीएचा अभ्यास करण्यासाठी निअभ्यासयोजन आणि वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचेसातत्य. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवले पाहिजे. मूळ पुस्तकांचा अभ्यास करून समजून घेवून परीक्षा द्यावी. मे महिन्यातील परीक्षा कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये झाली. परंतू लॉकडाऊनमध्येही मी अभ्यासात सातत्य ठेवले, पुर्व परीक्षा चाचण्या सोडवण्याचा सराव केला, त्यामुळेच मला आज हे यश मिळाले. माझे आई-वडील, नातेवाईकांना खूप आनंद झाला आहे. सीएसाठी कोल्हापुरात क्लास लावले. सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवले.
गोपेश दावडा (विद्यार्थी)
पहिल्याच प्रयत्नात यश
मनापासून चिकाटीने अभ्यास केल्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. कोल्हापुरात लावलेल्या खाजगी क्लासमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. कोरोना काळातील लॉकडाऊनचा अभ्यास करण्यासाठी भरपूर फायदा झाला.
अपुर्वा हार्दीकर (विद्याथीनी)
व्हर्च्युअल क्लास, ग्रुप स्टडीचा उपयोग
मी व्हर्च्युअल क्लास लावले होते. ग्रुप स्टडीदेखील केला त्यामुळेच पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. तसेच या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळाला. नियमित पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. या यशासाठी मला आई-वडीलांचे सहकार्य लाभले.
श्रुती शाह (विद्यार्थीनी)