ऑनलाईन टीम / जळगाव :
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंसस्य़ेत म्हणजेच बीएचआर संस्य़ेतील कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करणारा आरोपी सुनिल देवकीनंदन झंवर याला तब्बल 9 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता नाशिकमधून अटक केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे. झंवर हा मागील 9 महिन्यापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच अखेर आज सकाळी 10 च्या सुमारास अटक केली.
या बाबत अधिक माहिती देतान पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी सांगितले की, अटकेनंतर झंवर याला पुण्यात आणले जात आहे. यापुर्वी या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेवनिवृत्त शिक्षिका व ठेविदार रंजना घोरपडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.