वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील ग्रामस्थांतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती असा संयुक्त कार्यक्रम नुकताच साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त जवान विठ्ठल पाटील होते. प्रास्ताविकामध्ये ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.
ग्रा. पं. नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे यांनी केले. बाळासाहेब ठाकरे प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे, ग्रा. पं. सदस्य उमेश पाटील यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महापुरुषांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला पत्रकार सदानंद बामणे, जवान उमेश चौगुले, हभप अमोल भेकणे, हरीष बाचणे, संदीप अष्टेकरसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.