सेन्सेक्स 63.29 तर निफ्टी 10.20 अंकांनी घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी रमजान ईदमुळे सोमवारी शेअर बाजार बंद होता. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात मिळवलेली तेजी गमावत अंतिम क्षणी सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. सध्या देशातील कोविड19 ची दिवसागणिक वाढत जाणारी स्थिती ही चिंता वाढवणारी असून दुसऱया बाजूला सुरु असणाऱया चौथ्या सत्रातील लॉकडाऊनबाबत अनेक शंका असल्याच्या कारणामुळे शेअर बाजारातदेखील अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्स 63.29 अंकांनी घसरुन निर्देशांक 30,609.30 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,029.05 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्मयांनी घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, बजाज फायनान्स, सन फार्मा, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, नेस्ले आणि आयटीसी यांचे समभाग मात्र तेजीत राहिले आहेत. मंगळवारच्या सत्रात बाजाराला सकारात्मक सुरुवात झाली असली तरी विविध प्रकारच्या नियम व अटीच्या पातळीवर सुरु करण्यात आलेल्या उद्योग व्यवसायामुळे जगभरातील विविध शेअर बाजाराचा कल तेजीच्या बाजूने राहिल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
कोविड 19 ची धास्ती जगासोबत देशात कायम असल्यामुळे दिवसेंदिवस कोविड रुग्णांची वाढणारी संख्या ही पुन्हा चिंता निर्माण करणारी असल्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये दबावाचे वातावरण निर्माण होत असून जागितक बाजारातही काहीशी अशीच स्थिती असल्याचा अंदाज शेअर बाजारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.