वार्ताहर/ उचगाव
सुळगा गावामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने गावामध्ये दि. 4 जूनपासून 8 जूनपर्यंत पाच दिवस संपूर्ण गावामध्ये सीलडाऊन करण्यात येणार आहे. गावातील सर्व व्यवहार बंद करावेत आणि दुकाने, सोसायटय़ा व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
सकाळी 6 ते 10 पर्यंत किराणा दुकान चालू ठेवण्यात येणार असून कोणीही गावाच्याबाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्ती कुणी गावात येऊ नये, असा निर्णय ग्राम पंचायत व देवदेवस्की पंच कमिटीने घेतला आहे.