वार्ताहर /धामणे
सुळगे (येळ्ळूर) ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील यरमाळ येथे दि. 19 रोजी जिल्हाधिकारी ‘नडे गावकडे’ हा कार्यक्रम उत्साहाने सर्व शासकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला गावकऱयांकडून गावातील समस्या जाणून घेऊन त्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला यरमाळ येथील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून गावात अनेक नागरी समस्या असल्याचे गाऱहाणे येथे उपस्थित शासकीय अधिकाऱयांसमोर मांडले.
या कार्यक्रमाला तहसीलदार आर. के. कुलकर्णी, सुळगे ग्राम पंचायत अध्यक्षा गंगव्वा नाईक, पीडीओ दुर्गाप्पा तहसीलदार, लेखा आणि ग्रामलेखाधिकारी सुरेश मराठे, त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, हेस्कॉम अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.