बैलहोंगल / वार्ताहर
दिल्ली येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावून तीन अनोळखी युवक बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावच्या डोंगरात लपून बसल्याची चर्चा सुरू झ् मिळताच सुळेभावी गावच्या युवकाचा एक गट सोमवार रार्त्री डोंगरावर धाड घालताच बॅग सोडून अपरिचित तीन युवक फरार झाल्य़ाने गावात कांहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.गेल्या कांही दिवसापासून गावातील एका गौप्य स्थळावर दिल्लीहून तिघे युवक येऊन लपून बसले असल्याची बातमी गावावर पसरली होती. या विषयी पोलीसांनाही याबाबत ग्रामस्थांनी माहितीही दिली होती.सोमवारी रार्त्री गावच्या डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळताच सुळेभावी गावच्या युवकांनी डोंगरावर धाव घेतली व त्यांना बघताच आपल्याजवळ असलेली बॅक येथेच्छ सोडून पलायन केले. यावेळी युवकांनी त्यांचा डोंगरावर शोधाशोध केली परंतु त्यांचा सुगावा कांही लागला नाही.नंतर त्यांनी सोडून गेलेली बॅगची पडताळणी करून पाहणी केली असता बॅगेत जिवनावश्यक वस्तू व कांही कपडे सापडले.नंतर पोलीसांनी याची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी हजरहून त्या बॅगेची पाहणी केली. नंतर पोवीसांनी त्या बॅगा जाळून दिल्या.यावेळी गावातील युवकांनी गावच्या मशिदीत कांहीजण लपून बसले आहेत.रार्त्रीच्या वेळेत त्यांच्याकडून चलनवलनच्या कांही हालचाली होत असतात. पोलीसांनी तातडीने मशिदीत जाऊन पाहणी करावी व लपून बसलेल्या विरूद्र कठोर कारवाई करावी अशी मागणी करत पोलीसांवर आक्रोश व्यक्त केला. यावेळी घटनास्थळी हजर झालेल्या पोलीसांनी घटनास्थळी एकत्रित झालेले युवकावर लघु लाठीमार करत गटाला तेथून त्यांना पांगविले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.