बेळगाव /प्रतिनिधी
आपल्या विवाहाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण सढळ हस्ते मदत करत असतात. अशीच मदत शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विवाह समारंभदिनी केली. शिवप्रति÷ान हिंदुस्थान मजगाव, शिवप्रति÷ान हिंदुस्थान केदारवाडी येथील धारकऱयांनी रायगडावर पुनर्प्रस्थापित होणाऱया 32 मन सुवर्णसिंहासनासाठी मदत निधी सुपूर्द केला आहे.
बेळगावचे धारकरी बंधू गणपत अरुण अनगोळकर यांनी आपल्या विवाह सोहळय़ाच्या निमित्ताने 11,001 रुपये तर शिवप्रति÷ान हिंदुस्थान मजगाव येथील धारकरी महेश किरमटे यांच्यावतीने 3232 रुपयांचा निधी शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लापा पाटील, आशुतोष कांबळे, गजानन पाटील उपस्थित होते.