प्रतिनिधी / सातारा
सातारा- सातारा बॉक्सिंग अकॅडमी ची राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेती राष्ट्रीय खेळाडू कु. सृष्टी सुनीलकुमार रासकर हिची भारतीय खेल प्राधिकरण (एAघ्) व बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत खेलो इंडिया उपक्रमात भारतीय ज्युनिअर महिला बॉक्सिंग संघात प्रशिक्षण शिबिरासाठी (घ्ऱअ ण्Aश्झ्) निवड करण्यात आली. भारतातील 40 खेळाडूंमध्ये तिची निवड झाली. ती भारतीय खेल प्राधिकरण (एAघ्)औरंगाबाद येथे शिबिरासाठी दाखल झाली असून ती कसून सराव करत आहे.
आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याच शिबिरातुन भारतीय संघ निवडला जाणार आहे. सृष्टीला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहाय्यक प्रशिक्षक विनोद राठोड, सुनील जाधव, अक्षय ढाणे, तेजस यादव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, विभागीय सचिव योगेश मुंदडा व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, सचिव रवींद्र होले,खजिनदार संजय पवार, अमर मोकाशी, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर, मयुर डिगे, गणेश माने, शैलेंद्र भोईटे, अंकुश माने व सर्व पदाधिकारी,पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..