वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पातळीवर स्मार्टफोन शिपमेंटमध्ये चिनी कंपनी शाओमीची वर्षातील दुसऱया तिमाहीत दुसऱया स्थानी घसरण झाली असून या प्रवासात मात्र सॅमसंगने अव्वल स्थान प्राप्त केल्याची माहिती मार्केट रिसर्च फर्म कॅनलिस यांनी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एप्रिल ते जून या कालावधीत ग्लोबल स्मार्टफोन शिपमेंटसह शाओमीने आपले अग्रस्थान प्राप्त केले होते. परंतु आता ते स्थान शाओमीला गमवावे लागणार आहे. सदरच्या तिमाही दरम्यान 83 टक्के वाढ प्राप्त करत यादीत सॅमसंग प्रथम स्थानी राहिली आहे. कंपनीचा बाजारातील एकूण वाटा 19 टक्क्यांवर राहिला असल्याचे दिसून आले आहे.
कॅनलिसच्या अहवालानुसार पहिल्या पाच कंपन्यांमध्ये सॅमसंग 19 टक्क्यांच्या बाजारातील हिस्स्यासोबत पहिल्या स्थानी राहिली आहे. तर शाओमीचा बाजारातील वाटा 17 टक्क्यांवर राहिला आहे. तिसऱया स्थानी 14 टक्क्यांसोबत ऍपल राहिली आहे. ओप्पो आणि वीवोही पहिल्या पाचमध्ये राहिल्या आहेत.