वृतसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग गॅलक्सी टॅब एस 8 सिरीजअंतर्गत तीन नवे टॅब नुकतेच सादर करण्यात आले आहेत. एस 8, टॅब एस 8 प्लस आणि एस 8 अल्ट्रा असे तीन टॅब दाखल झाले आहेत.
एस 7 सिरीजच्या टॅबना यश मिळाल्यानंतर एस 8 सिरीजचे टॅब कंपनीने आणले आहेत. सदरच्या नव्या टॅबमध्ये 5 जी कनेक्टीव्हिटीची सोय तसेच व्हिडीयो व गेमिंग वापरणाऱयांसाठी क्वाड स्पीकर व फोटोग्राफी सुविधा असेल. 13 मेगापिक्सलचा डय़ुअल रियर कॅमेरा याला असेल.
एस 8 वायफाय मॉडेलची सुरूवातीची किंमत 58 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. 5 जी व्हेरियंट टॅबची किंमत 70 हजार 999 रुपये तर एस 8 प्लस वाय फायची किंमत 74 हजार 999 रुपये असणार आहे. टॅब एस 8 अल्ट्रा वायफायची किंमत 1 लाख 8 हजार 999 रुपये असेल. यांचे प्री-बुकिंग 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या काळात करता येणार आहे. ग्रॅफाइट, पिंक गोल्ड आणि सिल्वर रंगात टॅब खरेदी करता येणार आहेत.
टॅबची वैशिष्टय़े पाहुया
?ऑपरेटींग सिस्टम- अँड्रॉइड 12 बेसड वन युआय 4
?प्रोसेसर- 4 एमएम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रगन 8
? रॅम- 12 जीबी
?लेन्स- एलइडी फ्लॅशसह सेल्फी व व्हिडीयो कॉलिंग सुविधेसह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स
? स्टोरेज- 256 जीबी ऑनबोर्ड