बेळगाव : सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र परिवारकडून सामाजिक, धार्मिक ,आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यातील शैक्षणिक उपक्रमातील शालेय विद्यार्थी उत्तीर्ण गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 4 रोजी आदित्य कन्स्ट्रक्शन क्लब रोड येथे संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, माजी विद्यार्थी सचिन ऊसुलकर, संजय हिशोबकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रफुल शिरवलकर यांनी केले.
यावेळी सेंट्रल हायस्कूलच्या 2022/23 शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ओम सावगावकर, प्रथम रेडेकर, पवन पाटील, ओंकार पाटील, प्रथमेश काकती यांचा सत्कार संजय हिशोबकर, सचिन उसलकर मुख्याध्यापक हसबे यांच्या हस्ते करण्यात आला.
पावसात पडलेल्या भगव्या ध्वजाचा मान राखणारा बालमावळा श्री विशाल खडकीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यानंतर दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाभेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला 50 विद्यार्थी व पालक उपस्थित होते. याप्रसंगी विश्वजीत हसबे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश धामणकर व आभार प्रफुल्ल शिरवलकर यांनी मानले. आनंद चौगुले यांच्या ध्येय मंत्रांने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद हंगिरकर गिरीश धामणीकर संजय हिशोब कर लक्ष्मीकांत हावळ राजू पाटणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले