मारिहाळ पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
शिंदोळी येथील लक्ष्मीपुरम परिसरात सेंट्रिंगचे साहित्य चोरणाऱया त्रिकुटाला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुनील कुम्मानी बेळगावकर (वय 22), लक्ष्मण नारायण बाळेकुंद्री (वय 25), केतन केशव पाटील (वय 22, तिघेही रा. धामणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी 60 सेंट्रिंगच्या प्लेटा, 35 लोखंडी जॅक, 17 लोखंडी चॅनेल व गुन्हय़ासाठी वापरलेली केए 22 सी 8980 क्रमांकाचे बोलेरो गुड्स वाहन असा एकूण 4 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.