प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरात आसदखान दर्ग्याजवळून जाणाऱया रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले होते. सेंट जोसेफ शाळेसमोर टाकण्यात आलेल्या कचऱयामुळे कचरा डेपोचे स्वरुप आले होते. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डने सदर कचऱयाची उचल करून हा परिसर स्वच्छ केला. या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेंट जोसेफ शाळेसमोर टाकण्यात आलेल्या कचऱयामुळे कचराकुंडीला कचरा डेपोचे स्वरुप आले होते. रस्त्याशेजारी झाडेझुडपे वाढल्याने या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रकार सुरू होता. कचऱयाचा ढिगारा इतका मोठा साचला होता की त्यामुळे या परिसराला कचरा डेपोचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे कचऱयाची उचल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून अस्वच्छतेकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे लक्ष वेधले होते. येथील कचऱयाची उचल करण्याबरोबरच परिसर स्वच्छ करण्याची मोहीम कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने राबविण्यात आली. येथील कचऱयाची उचल करून झाडेझुडपे कापण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱयांच्या पथकाची नियुक्ती करून हे काम करण्यात आले. या ठिकाणी कचरा साचू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. मात्र नागरिक कचरा टाकून जात आहेत. वास्तविक पाहता हा परिसर शाळेच्या परिसरात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे या परिसरात कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे कचरा साचू नये याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आले आहे.