सेन्सेक्स 37.38 तर निफ्टी 14.10 अंकांच्या घसरणीसह बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात तिसऱया दिवशी बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीचे बाजार हलकीशी घसरण नोंदवत बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक शेअर बाजाराचा सकारात्मक कल यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात प्रामुख्याने कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरले आहेत.
सदर घसरणीचा प्रभाव देशातील शेअर बाजारावर पडल्याने सेन्सेक्सने काही वेळ 38,125.81 इतकी घसरण नोंदवली आहे. परंतु दिवसअखेर बाजार बंद होताना सेन्सेक्स 37.38 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,369.63 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14.10 अंकांनी हलकीशी घसरण होत निर्देशांक 11,308.40 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वाधिक दोन टक्क्मयांनी नुकसानीत राहिली आहे. यासोबत सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टायटन आदी कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसऱया बाजूला एचसीएल टेकचे समभाग 4 टक्क्मयांनी वधारले असून स्टेट बँक, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी आणि पॉवरग्रिडचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
देशासह जगातील आर्थिक घडामोडीसंदर्भात नकारात्मक वाढत्या घटनांमुळे शेअर बाजार प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन जूनमध्ये 16.6 टक्क्मयांनी घटले व दुसऱया बाजूला जागतिक पातळीवरील कोविड 19 रुग्णांची संख्या 1.02 कोटीच्या घरात गेल्याने गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
वरील घटनेप्रमाणेच देशात कोविड संसर्गाच्या वाढत्या घटनांचा आलेख हा 23 लाखाच्या वरती पोहोचला असल्याचा परिणामही देशातील शेअर बाजारावर पडत गेल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रामुख्याने चीनचा हाँगकाँग, दक्षिण कोरियाचा सोल हे लाभात राहिले.