वृत्तसंस्था/ पॅरिस
डब्ल्यूटीएने जाहीर केलेल्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या क्रमवारीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स 2006 नंतर पहिल्यांदाच टॉप 50 मधून बाहेर पडली आहे. ती आता 59 व्या स्थानावर पोहोचली आहे.
40 वर्षीय सेरेनाने गेल्या वर्षी फक्त सहा स्पर्धांत भाग घेतला होता. विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिला पायाच्या दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी तिला बरोबरी साधता आली नाही. मानांकनात तिची 12 स्थानाने घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने अग्रस्थान कायम राखले आहे. सिडनी स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या पॉला बेडोसाने सहाव्या स्थानावर झेप घेतली असून गेल्या वर्षी तिने 67 व्या स्थानापासून सुरुवात केली होती. पेंच ओपन स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. अमेरिकेची मॅडिसन कीजने 36 स्थानांची प्रगती करीत 51 वे स्थान मिळविले आहे. तिने नुकत्याच झालेल्या ऍडलेडमधील स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. अडीच वर्षाच्या खंडानंतर तिने ही पहिली डब्ल्यूटीए स्पर्धा जिंकली होती.
टॉप 20 खेळाडू ः 1) बार्टी 7111 गुण, 2) साबालेन्का 5698 गुण, 3) गार्बिन मुगुरुझा 5425 गुण, 4) बार्बोरा क्रेसिकोव्हा 5213 गुण, 5) कॅरोलिना प्लिस्कोव्हा 4582 गुण, 6) पॉला बेडोसा 4264 गुण, 7) ऍनेट कोन्टावेट 4231 गुण, 8) मारिया सॅकेरी 4071 गुण, 9) इगा स्वायटेक 3916 गुण, 10) ऑन्स जेबॉर 3500 गुण, 11) पावल्युचेन्कोव्हा 2968 गुण, 12) इलेना रीबाकिना 2765 गुण, 13) सोफिया केनिन 2762 गुण, 14) नाओमी ओसाका 2696 गुण, 15) सिमोना हॅलेप 2657 गुण, 16) कोको गॉफ 2655 गुण, 17) स्विटोलिना 2641 गुण, 18) रॅडुकानू 2595 गुण, 19) पेत्र क्विटोव्हा 2530 गुण, 20) अँजेलिक केर्बर 2517 गुण. 51) मॅडिसन कीज 1153 गुण, 59) सेरेना विल्यम्स 1061 गुण.