वार्ताहर/ कराड
कराड तालुक्यातील सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आंतर्गत येणाऱया सैदापुर व विद्यानगरचे नागरीकरण मोठया प्रमाणात वाढल्याने सैदापुरसाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करावे. तसेच बनवडी, विरवडे व गोवारे या तिन गावांसाठी उपकेंद्रांना मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हापरीषद सदस्य सागर शिवदास यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे व खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
रविवारी सातारा व कोल्हापुर जिल्ह्यातील कोरोना परीस्थीतीचा आढावा व उपाययोजना राबवण्यासंदभांत टाऊन हॉल येथे लोकप्रतिनिध्घ व अधिकाऱयांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सागर शिवदास यांनी मागणीचे निवेदन राजेश टोपे व शरद पवार यांच्याकडे दिले.यावेळी प्रहारचे मनोज माळी उपस्थीत होते.
सागर शिवदास म्ह्णाले की, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आंतर्गत एकुण 17 गावे येतात. यात सुर्ली, कामथी, मेरवेवाडी व पाचुंदसारखी दुर्गम गावे आहेत. तर सैदापुर, विद्यानगर, ओगलेवाडी, गोवारे सारखी झपाटयाने नागरीकरण वाढणारी गावे आहेत. केवळ सहा उपकेंद्राच्या माध्यमातुन सध्या 17 गावांना आरोग्य सेवा पुरवण्याची कसरत सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राला करावी लागत आहे.
सैदापुर व विद्यानगरला मोठयाप्रमाणात नागरीकरण वाढल्याने सैदापुरला स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच बनवडी, गोवारे व विरवडे या तिन गावात नविन उपकेंद्र होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सैदापुरला स्वतंत्र्घ प्राथमिक आरोग्य केंद्रा व तिन गावांना उपक्रेंद्रांना मंजुरी द्यावी अशी मागणी सागर शिवदास यांनी केली आहे.