बेळगाव :/ प्रतिनिधी
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शिवाजी स्टेडियमवर भरती प्रक्रिया सुरू आहे. मंळवारपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून विविध राज्यातील युवक दाखल होत आहेत. दाखल झालेल्या युवकांचे खाण्यापिण्याविना हाल होऊ नये, यासाठी गुरुवारी कॅम्प येथील खादीमीन संस्थेने पुढाकार घेऊन युवकांची अल्पोपहाराची क्यवस्था केली.
प्रत्येक राज्यातील युवकांसाठी एक दिवस ठरवून दिला आहे. त्यानुसार भरती प्रकियेसाठी वेगवेगळय़ा राज्यातून युवक मराठा इन्फंट्रीमध्ये दाखल होत आहेत. भरतीसाठी पहाटे युवकांना हजर व्हावे लागते. युवकांचे खाण्यापिण्याविना हाल होऊ नये, याची दखल घेत खादीमीनने युवकांना पुलावा व पिण्याच्या पाण्याची सोय केली.